भावाच्या पत्नीला सोबत घेत मुलीनेचं आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आईची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कारही घाई घाईने उरकले. मात्र याबाबत दुसऱ्या मुलीने आपल्या आईचा घातपात झाल्याची तक्रार पोलिसात केल्याने खुनाचे बिंग फुटले आणि ३ ऑक्टोबरच्या रात्री नलेश्वर येथे घडलेल्या घटनेचा थरार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे घडली आहे.
तानाबाई महादेव सावसाकडे (वय ६५, रा. नलेश्वर) असे मृतक महिलेचे नाव आहे. मृत महिलेची दुसरी मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलिसात तक्रार केली.मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक महल्ले यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मृत महिलेची मुलगी वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले.
‘या’ कारणासाठी केला खून…
वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून मुलगी वंदना हिने तिच्या आईला वहिनी चंद्रकला हिला सोबत घेऊन नाक व तोंड दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला असून दोनही महिलांना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.