मुंबई : गर्दीच्या वेळी लोकलच्या डब्यातली होणारी भांडणं मुंबईकरांसाठी नवी नक्कीच नाहीत. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. अशातच आता लोकलच्या लेडिज डब्ब्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दोन महिला तावातावाने एका तरुणीला जाब विचारत मारहाण करु लागल्याचं दिसून आलंय. केस ओढत, पाठीत बुक्के घालत, या महिलेवर इतर प्रवासी महिला तुटून पडल्या होत्या. याच डब्ब्यात असणाऱ्या काही महिलांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. ही घटना मुंबईच्या ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर घडली. ठाणे-पनवेल लोकलदरम्यान, ही हाणामारी झाली.
WWE IN MUMBAI LOCAL…pic.twitter.com/bQibZIRrsD
— Aditya Bidwai (@AdityaBidwai) October 6, 2022
शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत
ठाण्यावरून बसलेल्या आज्जू तोवित खान आणि गुळनाथ जुबेरखान यांनी स्नेहा देवडे या महिलेशी सीटवरून वाद सुरू केला. त्यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले भांडण सोडवण्यासाठी चढल्या.
मात्र यावेळी मारामारी करणाऱ्या आरोपी आज्जू तोवित खान हिने महिला पोलिसाला सुध्दा मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला लागून त्या देखील रक्तबंबाळ झाल्या. स्नेहा देवडे या देखील या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.