जळगाव : राज्यातील विविध भागात मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाचे जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान केले आहे. जळगाव जिल्ह्यातही परतीचा पाऊस थैमान घालत असल्याचे दिसून येतेय. जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. अशातच आता आज शुक्रवारी देखील राज्यातील इतर भागासह जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काय आहे जिल्हा प्रशासनाचा इशारा?
जळगाव जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूईवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा 100% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे धरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा :
मुंबई लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी ; VIDEO व्हायरल
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC मार्फत बंपर भरती, त्वरित करा अर्ज
चेक बाऊन्स प्रकरणात कठोरतेसाठी येणार नवीन नियम, खात्यातून पैसे काढता येणार नाहीत!
“गोपाल रत्न पुरस्कार” करिता करा अर्ज ; प्रथम क्रमांकाकरिता 5 लाख रु. ; कोण करू शकतो अर्ज, जाणून घ्या
शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटांसह कोसळणार असल्याने पावसा दरम्यान विजा व अतिवृष्टी पासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच याप्रसंगी झाडाखाली वीजवाहिनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांबू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.