दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अंगावर अचानक पडल्याने मोठा गोंधळ उडाला या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी काहीना किरकोळ इजा झाल्या तर काहींचे कपडे जळाले आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रावणाचा पुतळा लोकांवर पडताना दिसत आहे.सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.हरियाणातील यमुनानगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे.
#WATCH | Haryana: A major accident was averted during Ravan Dahan in Yamunanagar where the effigy of Ravana fell on the people gathered. Some people were injured. Further details awaited pic.twitter.com/ISk8k1YWkH
— ANI (@ANI) October 5, 2022
उपस्थित नागरिकांच्या अंगावर अचानक पडलेला पुतळा पाहून जमावात एकच खळबळ उडाली. त्या ठिकाणी उपस्थित लोकांची धावपळ पाहायला मिळाली. या अपघातात डोक्याला मार लागल्याने तीन जण जखमी झाले. तर दोघांचे कपडे जळाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेत नेण्यात आले. लोकांवर पुतळा पडल्याचे पाहून चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले, त्यानंतर पोलीस कर्मचार्यांना लोकांना बाहेर काढावे लागले. दरम्यान, जमावात अपघातानंतर घबराट आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.