चोपडा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील अकुलखेडा गांवा जवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारी जवळ अज्ञात इसमाने एका ३० वर्षीय तरुणांच्या गुप्त अंगावर मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून मयताचे नांव दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) वय ३० रा. पिसनावल ता सेवा बडवणी ह.मु. अकुलखेडा ता चोपडा असे आहे.सदर घटना दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे सांयकाळी १६.३० ते दिनांक ०३/१०/२०२ २ रोजी सकाळी १०.३० वा पुर्वी दरम्यान घडली आहे याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या भावाने दिलेल्या फिर्याद नुसार दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे सांयकाळी ४.३० ते दिनांक ०३/१०/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा पुर्वी कोणी तरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन फिर्यादी दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा ) याचा भाऊ नामे दिनेश वेरसिंग सस्ते ( पावरा) वय ३० रा. पिसनावल ता सेधंवा जि बडवणी ह.मु. २ अकुलखेडा ता चोपडा यास अकुलखेडा गांवाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारीजवळ कोणत्या तरी अज्ञात वस्तु त्याचे गुप्त जे अंगावर मारुन गुप्त अंगास गंभीर दुखापत करुन त्याचा खुन केला आहे.
मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग (पावरा) वय ३५ धंदा रा. पिसनावल ता सेधंवा जि बडवणी ह.मु. चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञता विरुद्ध CCTNS गुरन ४९४/२०२ २ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार अवतारसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक चोपडा शहर हे करित आहे.