जळगाव (प्रतिनिधी) : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांची रात्री नियुक्ती करण्यात आली होती. याबाबतचे आदेशही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पारीत केले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजी बी.जी.शेखर यांनी स्थगिती दिली.
पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी रात्री काढले होते. किसनराव नजन-पाटील यांच्याकडे पाचोरा पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार नियमित नेमणुक आदेश होईपावेतो देण्यात आला होता.
हे पण वाचा :
शिधापत्रिकाधारकांवर सरकारची मोठी कारवाई ; २.४ कोटी रेशन कार्ड रद्द, यात तुमचे तर नाही?
दररोज 14 ते 15 लोक माझ्यावर बलात्कार करायचे ; 14 वर्षांच्या तरुणीची हृदय हेलावून टाकणारी कहाणी
सोने 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ; वाचा आजचा 10 ग्रॅमचा नवीनतम दर
सुकी नदीपात्रात तब्बल २२ मृत बैल आढळले ; परिसरात खळबळ
परंतू आज दुपारी आयजी बी.जी.शेखर यांनी किसनराव नजन-पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. तसेच आता एलसीबीची धुरा एपीआय जालिंदर पळे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत राहणार आहेत.