अचलेर, (महेश गायकवाड)- अचलेर येथील अ भा शिवा विरशैव संघटनेच्या शाखेला 21 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्या शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 22 रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा मुक्तीदिनाचे औचित्य साधून
येथील बाजार चौकात वीरशैव लिंगायतांचा भव्य मेळावा आणि म्हास्वामीजीं चे गुरुपदेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अ भा शिवा वीरशैव संघटनेच्या अचलेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सुयश मीडिया ग्रुप चे प्रमुख महेश गायकवाड यांच्या शी बोलतांना दिली.
या मेळाव्याचे उदघाटन शिवा वीरशैव संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदगाव येथील विरक्त मठाचे म्हास्वामीजी म. नि. प्र. राजशेखर म्हास्वामीजी असणार आहेत. तर संघटनेचे सर्व वरिष्ठ आणि जेष्ठ नेते यावेळीउपस्थित राहणार आहेत, गुरुपदेश करण्यासाठी म.नि. प्र. जयशांतलिंग म्हास्वामीजी विरक्त मठ हिरे मागाव, श्री ष.ब्र. 108 शिवयोगी शिवाचार्य म्हास्वामीजी निलकंठेश्वर मठ,अणदूर, म.नि. प्र बसवराजेंद्र महास्वामीजी , आनंद आश्रम अचलेर-जिडगा, म. नि. प्र. गंगाधर म्हास्वामीजी गुरुसिद्धेश्वर विरक्त मठ, जेवळी, म. नि. प्र. विरंतेश्वर म्हास्वामीजी केसरजवळगा, श्री ष.ब्र.108 शभुलिंग शिवाचार्य म्हास्वामीजी, हावगी स्वामी संस्थान, उदगीर, पडसावळी, श्री ष.ब्र. 108 बसवराज शिवाचार्य म्हास्वामीजी हिरेमठ, नळदुर्ग, श्री ष.ब्र. 108 गणरुद्रमणी शिवाचार्य म्हास्वामीजी राजेश्वर मठ, राजेश्वर,श्री ष. ब्र.सुतरेश्वर शिवाचार्य म्हास्वामीजी, हिरेमठ संस्थान अचलेर, दत्त महाराज अचलेर, हे सर्व स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.
संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा शेटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील, धन्यकुमार शिवणकर, विठ्ठल ताकबिडे, सातलिंग स्वामी, वैजनाथ तोनसुरे, शैलेश जकापुरे, अरविंद भडोळे पाटील, परमेश्वर अरबळे, संजय कोठाळे ,अर्जुनराव सैदाने, मनिष काळजे, श्रावण जंगम, राजकुमार सारणे, संजय गिराम प्रफुल्ल कुमार शेटे, राजेंद्र कारभारी, सुनील शेरखाने, बसवराज वरनाळे, सुरेश वाले, संतोष केंगनाळकर, हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटना शाखा अचलेर, तसेच सर्व विभागीय जिल्हा व तालुका आणि सर्व शाखा पदाधिकारी शिवा संघटना कर्मचारी महासंघ, शिवा महिला आघाडी, शिवा सोशल मीडिया, शिवा विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.