नवी दिल्ली : देशात बलात्काराचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून येतेय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच असून नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसतेय. अशातच बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली.
आपल्या प्रियकरासोबत एकटी बसलेल्या मुलीला चार जणांनी ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार केला. एवढंच नव्हे तर आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओही बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध अल्पवयीन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
एक प्रेमी युगूल बसलेले असताना याचवेळी याठिकाणी चार तरुण आले. यानंतर या तरुणांनी प्रियकराला ओलीस ठेवले. तसेच त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तेथून पोबारा केला. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जंदाहा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यात चार मुलांनी या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा..
प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत दरमहा मिळेल ‘इतके’ पेन्शन
शेतकऱ्यांना महागड्या डिझेलपासून मिळेल मुक्ती, फुकटात सिंचन करून उत्पन्न वाढेल
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
कामगारांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?
हे सर्व आरोपी एकाच गावातील असल्याचे सांगण्यात येत आहेत. आरोपींनी तिला ब्लॅकमेल केले यानंतर तिच्यासोबत दुष्कर्म केले. यावेळी ही मुलगी खूप घाबरुन गेली होती. आम्हाला सोडून द्या, अशी विनंतीही या मुलीने या तरुणांना केली होती. मात्र, या नराधमांनी तिचे काहीच ऐकले नाही. तसेच सर्व सीमा पार करत तिच्यासोबत दुष्कर्म केले. तसेच तिथून पोबारा केला.