अकोला : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये अपेक्षाप्रमाणे गुण कमी पडल्यामुळे एका २२ वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. अकोला शहरातील मध्य भागात असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत या तरुणीने आत्महत्या केलीय. रोहिणी विलास देशमुख असं मृतक तरुणीचे नाव असून या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण
यापूर्वी रोहिणी हीने नीट परीक्षा दिली होती. मात्र, तिला या परीक्षेत 350 च्या जवळपास गुण मिळाले होते. आता यंदा म्हणजेचं दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला 420 गुण मिळाले. रोहिणी ओपन प्रवर्गातून येत असल्याने तिला 565 च्यावर गुणाची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाप्रमाणे तिला कमी गुण पडल्याने रोहिणी तणावात होती.
रात्री नित्याप्रमाणे रोहिणीने कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपून गेले. गुरुवारी पहाटे 5 वाजता झोपेतून उठून बाहेर पडली नाही. अन् या तणावातूनच तिने टोकाचा निर्णय घेतलाय. अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन तिने उडी घेत आत्महत्या केली. तिच्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुबांला धक्का बसला. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
हे पण वाचा :
गणपती विसर्जनपूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी, मिळेल तुम्हाला इच्छित जीवनसाथी…
पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; दोन शाळकरी मुलांचा डोहात बुडून मृत्यू, शिरसोलीजवळील घटना
..म्हणून महिलेने ब्युटी पार्लरवाल्याला चप्पलने धुतलं ; पहा ‘हा’ व्हिडीओ
तुम्हीही बिअरचे शौकीन आहात? मग ही बातमी नक्कीच वाचा, पहा काय घडलं जळगावात
वडिलांचं डॉक्टर बनायचं स्वप्न अधूरं राहीलं
दरम्यान, रोहिणीचे वडील राजस्थानमध्ये राहतात. ती तिच्या मामाकडं अकोल्यात राहायची. वडिलांसह कुटुंबाचं रोहिणी डॉक्टर व्हावं असं स्वप्न होतं. मात्र आपण कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करू शकली नाही. दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात यश आलं नाही. वैद्यकीय क्षेत्रात काम करत बेटी बचाव या उपक्रमांतर्गत तिला अनेक काम करायचेही स्वप्न होती. दरवर्षी अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. नीटच्या माध्यमातून घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. रोहिणीदेखील याची तयारी करीत होती.