‘साप’ कधी कुणाच्या कानात ‘बीळ’ समजून घुसून बसू शकतो यावर विश्वास बसणारचं नाही, पण हा व्हिडीओ पहिल्या नंतर या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल असंच दिसत आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीच्या कानात ‘साप’ घुसला आहे. मुलीला सापाची माहिती मिळताच ती घाबरली आणि लगेच डॉक्टरांकडे धाव घेत कानातून सापाला बाहेर काढण्यात येत असल्याचं दिसत आहे.व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील कारण कानात घुसलेला साप लहानसा दिसत असला तरि खूपच धोकादायक दिसत आहे. एक डॉक्टर मुलीच्या कानात घुसलेल्या सापाला चिमट्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
घटना कुठली याबाबत पुष्टी नाही… पण व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल….
मुलीच्या कानात साप गेल्याचा व्हिडीओ अतिशय भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारा आहे, मात्र घटना कुठली आहे या बाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सदर व्हिडीओ मध्ये ‘साप’ डॉक्टर मुलीला बसवून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे,लहान चिमट्याने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असून लहानसा साप त्याच तोंड मोठं करतांना दिसत आहे.व्हिडिओमध्ये ‘साप’ अनेकदा तोंड उघडताना दिसत आहेत. दरम्यान महिलेच्या चेहऱ्यावर वेदना होतं असल्याचं उमटत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.या घटनेनं लोक आश्चर्यचकित झाले आहेत.