नवी दिल्ली : गाझियाबादच्या नंदग्राम पोलिस स्टेशन हद्दीतील राजनगर एक्स्टेंशनमध्ये असलेल्या चार्म्स काउंटी सोसायटीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेसोबत जाणाऱ्या कुत्र्याने मुलाला चावा घेतला. परंतु कुत्र्याच्या मालकीणीला त्याचे काहीच वाटले नाही. ती फक्त त्या मुलाकडे बघत होती. त्या निरागस मुलाला एकदाही पाहण्याची तसदी मालकीणीने घेतली नाही आणि ते मूल वेदनेने ओरडत राहिले. या प्रकरणी कुत्र्याच्या मालकीणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा (9) हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे. सोमवारी संध्याकाळी तो शिकवणीवरून परतत असताना एक महिलाही तिच्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमध्ये आली. यादरम्यान महिला कुत्र्यासह लिफ्टमध्ये मागे येते आणि कुत्र्याच्या भीतीने मूल पुढे चालते. या दरम्यान कुत्रा मुलावर झपाटून चावा घेतो. त्याचवेळी, व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मूल वेदनेने करपत आहे आणि महिला उभी राहून पाहत आहे.
ग़ाज़ियाबाद…राजनगर एक्सटेंशन के चार्म्स काउंटी सोसायटी का हैरान कर देने वाला वीडियो…लिफ़्ट में महिला के साथ जा रहे कुत्ते ने बच्चे को काटा…बच्चा दर्द से कराहता…नहीं पसीजा महिला का दिल..थाना नादग्राम में एफआईआर दर्ज… @ghaziabadpolice
#Viral pic.twitter.com/KeQnQqVeo2— Prashant Singh (TV9 Bharatvarsh) (@prashant_rohan) September 6, 2022
पोलिसांना फोन करूनही महिला आली नाही
या दरम्यान महिला मुलाला सांभाळण्याचा प्रयत्नही करत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्रा चावल्याची माहिती मुलाच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी आरोपी महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिने योग्य प्रतिसाद न दिल्याने ते तिच्या फ्लॅटमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना बोलावूनही ही महिला फ्लॅटमधून बाहेर आली नाही.सध्या पोलिसांनी बाळाला मेडिकलसाठी पाठवले आहे.