नवी दिल्ली : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचीही सोने खरेदीची योजना असेल तर आज तुम्हाला कमी पैसे खर्च करावे लागतील. बुधवारी एमसीएक्समध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) वर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे.
सोने किती स्वस्त झाले?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 7 सप्टेंबर 2022 रोजी सराफा बाजारात सोन्याची किंमत 339 रुपयांनी घसरून 50422 वर आली आहे. त्याच वेळी, एमसीएक्सवर सोने 256 रुपयांनी घसरून 50025 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चांदी स्वस्त झाली आहे
याशिवाय चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर आज त्यातही घसरण दिसून आली आहे. चांदीचा भाव 53000 पर्यंत खाली आला आहे. सराफा बाजारात चंगी 880 रुपयांनी स्वस्त होऊन 52,816 रुपये किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. त्याच वेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या दरात 82 रुपयांची किंचित घट झाली आहे. यानंतर चांदीचा भाव 53,064 रुपयांवर आला.
सोने खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की बनावट हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.
हे पण वाचा :
लिफ्टमध्ये कुत्र्याने घेतला चिमुकल्याचा चावा, मालकीण फक्त राहिली बघत ; Video पाहून लोकांचा संताप
रेडमीचा बजेट वाला स्मार्टफोन लॉन्च, इतकी आहे किंमत?
संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
आईवडिलांनीच रचला पोटच्या मुलीच्या हत्येचा कट ; कारणही आहे काळजाचा थरकाप उडवणारं..
तुमचे शहराचे दर तपासा
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.