जळगाव: शिंदे गटातील राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जळगावमध्ये एका कार्यक्रमात डॉक्टर यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे.
गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलं आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. यावेळी गुलाबरावांनी चांगलीच टोलेबाजी केली. आम्ही जनरल फिजीशीअन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, 50 खोके एकदम ओक्के, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला हिणवलं जात आहे. याच टीकेवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांना उघडपणे चॅलेंज दिलं.
“मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.