पनवेल : राज्यात एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल झाले आहे, तर आता मनसेचे नेते सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहे. पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे सरकारला महिना पूर्ण झाला आहे. पण अजूनही शिंदे गटामध्ये शिवसेचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशाचा धडाका लावला आहे. पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अतुल भगत हे मागील ८ वर्षांपासून जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान होते. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल भगत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्यासह एकूण 65 जणांनी घेतला शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हे पण वाचा :
तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा.. मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा
बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती
मोठी बातमी : 8 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं
प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती, 59,700 पगार मिळेल
विशेष म्हणजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. बहुमत चाचणीमध्ये मनसेनं शिंदे-भाजप सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं. मनसेने शिंदे गटाला जाहीर करण्यात पाठिंबा दिल्यानंतरही पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहे. आता या प्रवेशावरून शिंदे गट आणि मनसेमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली आहे.