जळगाव : महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात सत्ता बदल होताच गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, यानंतर गिरीश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या वाहनात ड्रग टाकायचे ते पकडायचे आणि आपल्याला ‘ड्रग माफिया’ म्हणून घोषित करून तुरुंगात टाकायचे, असे एखाद्या साउथ इंडियनच्या चित्रपटाला लाजवेल, असे षडयंत्र आपल्या विरुद्ध करण्यात आले होते. त्याबाबत झालेल्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचा उलगडा झाला आहे. त्याची चौकशी आता ‘सीबीआय’कडे (CBI) देण्यात आली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी दिसून येईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
हे पण वाचा :
बापरे.. 23 दिवसांमध्ये जळगावसह राज्यातील 89 शेतकऱ्यांनी संपविले जीवन
जळगाव शहर पुन्हा हादरले; तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून
अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीचा संधी.. त्वरित करा अर्ज
अरे देवा.. बापचं आपल्याच चिमुरड्यांना दारु पाजतोय, ‘हा’ शॉकिंग Video एकदा बघाच
माझ्या विरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा पुण्यापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या एका गावात दाखल करण्यात आला. त्यातही पोलिसांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता. याबाबत प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कोणी तरी रेकॉर्डिंग केले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधिमंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून हे सर्व उघडकीस आणले.