अमरावती : सध्या सोशल मीडिया एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तो म्हणजे चक्क एक बाप आपल्याच पोरांना दारु पाजतोय. त्यात एक लहान मुलगी आणि एक अगदीच चिमुरडा आहे. या सगळ्यांसोबत चिमुरड्यांचा बापही समोर बसलाय. पण आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाप नेमके आपल्या पोरांवर कसले संस्कार करतोय, यावरुन चर्चांना उधाण आलंय.
व्हिडीओमध्ये काय दिसतंय?
एकूण दोन मिनिटं 25 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. एक माणूस खाली बसला. त्याच्यासमोर एक अल्पवयीन मुलगाही दारु पितोय. चकीत करणारी गोष्ट म्हणजे याच व्हायरल व्हिडीओमध्ये एका लहान मुलाच्या हातात दारुचा ग्लास दिसतोय. हे बाळ अगदीच लहान आहे. या मुलाला दारुचे घोट पाजताना नंतर त्याचा बाप थट्टा मस्करीत त्याला चकणाही भरवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Video : बापाने पोरांना दारु पाजली, वरुन चकणाही भरवला! अमरवतीचा शॉकिंग व्हिडीओ एकदा बघाच#Amravati #Crime #AmravatiCrime #Child #Liquor
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/YAwmD3nr03
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 23, 2022
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, याच व्हिडीओत एक लहान मुलगीही दिसते. तिच्या हातात तर थेट बिअरची बाटली आहे. बिटरचे घोट रिचवत ही मुलगी थेट बिअरच्या बाटलीतूनच दारु ढोसत असल्याचं दिसून आलंय. तर अल्पवयीन मुलगाही ग्लासातून दारु पिताना दिसून आलाय.