मुंबई : देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत महाराष्ट्रातून एक धक्कादायक बाब समोर आलीय. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर केला होता. मात्र गेल्या 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद, बीड, यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या केल्याची वृत दिव्य मराठीने दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा केल्या आहे. आतापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांनी तीनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये शहरांचं नामांतर, थेट सरपंच निवडणूक, आरे कारशेड, एमएमआरडीएच्या कर्जाची घोषणा केली आहे, पण अजूनही शेतकऱ्यांना दिलासा देणारी कोणताही घोषणा सरकारने केली नाही. राज्यात आधीच अस्मानी संकट आले असताना कृषि खात्याचा कारभार अजूनही वाऱ्यावरच आहे. त्यातच गेल्या 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :
जळगाव शहर पुन्हा हादरले; तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून
अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीचा संधी.. त्वरित करा अर्ज
अरे देवा.. बापचं आपल्याच चिमुरड्यांना दारु पाजतोय, ‘हा’ शॉकिंग Video एकदा बघाच
क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान! ‘या’ निष्काळजीपणामुळे चुना लागू शकतो
सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद जिल्ह्यात केल्या आहेत. त्यापाठोपाठ बीडमध्ये 13 आणि यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. परभणी 6, जळगाव 6, जालना 5, बुलडाणा 5, उस्मानाबाद 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3, नांदेड 2 आणि भंडारा-चंद्रपूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.