जळगाव: जळगाव शहर पुन्हा एका हत्येच्या घटनेने हादरले आहे. तीन दिवसात खूनाची ही दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.शुक्रवारी रात्री तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्याचा खून केल्याची धक्कादायक शहरातील हरिविठ्ठल नगरमध्ये घडलीय. दिनेश काशिनाथ भोई (वय ३२) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर अवघ्या तासातच पोलिसांनी विठ्ठल माऊली हटकर या संशयिताला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसा असे की, हरिविठ्ठल नगरात दिनेश भोई हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास होता. त्याच्या घरासमोरच विठ्ठल माऊली हटकर हा राहतो. विठ्ठलसोबत भोई परिवाराचा जुना वाद आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दिनेश आणि विठ्ठल यांच्यात वाद झाला. या वादातून दोघेही घरासमोर अंगणात आले. या वादातून विठ्ठलने दिनेशच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला. यात दिनेश हा घटनास्थळी कोसळला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. मृत दिनेश याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. सेंट्रींग काम करुन तो उदरनिर्वाह भागवित होता.
घटनास्थळानजीक लपून बसलेल्या संशयिताला अटक
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तसेच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी संशयित विठ्ठल हा एका ठिकाणी लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख या कर्मचाऱ्यांनी विठ्ठल यास अटक केली. त्याच्याकडून रॉड जप्त करण्यात आला असून त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे पण वाचा :
अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीचा संधी.. त्वरित करा अर्ज
अरे देवा.. बापचं आपल्याच चिमुरड्यांना दारु पाजतोय, ‘हा’ शॉकिंग Video एकदा बघाच
क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान! ‘या’ निष्काळजीपणामुळे चुना लागू शकतो
मारेकरी संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील
जळगाव शहरात दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेला तीन दिवस उलटत नाही, तोच हरिविठ्ठल नगरात एका तरुणाचा खून झाला आहे. शेवटचे वृत्त हाती तोपर्यंत याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, मारेकरी संशयित विठ्ठल हटकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तो हिस्ट्रृीशिटर असल्याची माहिती मिळाली आहे. अनैतिक संबंधातून खून झाल्याचीही घटनास्थळी चर्चा होती. मात्र, याला दुजोरा मिळू शकलेला नाही. जुन्या वादातूनच हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.