नवी दिल्ली : सरकारच्या प्रयत्नानंतर खाद्यतेलाचे दर खाली येत आहेत. खाद्यतेल विक्रेत्या कंपन्यांनी त्यांच्या तेलाच्या ब्रँडच्या किमतीत कपात जाहीर केली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, आता फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणारी खाद्यतेल कंपनी अदानी विल्मारने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे.
नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येईल. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती. खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने 6 जुलै रोजी एक बैठक बोलावली होती, ज्यामध्ये सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते.जागतिक किमतीतील घट लक्षात घेता आणि खाद्यतेलाच्या किमतीतील कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, अदानी विल्मारने खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात केली आहे. गेल्या महिन्यातही दर कमी करण्यात आले होते.
हे देखील वाचा :
संजय राऊतांचा अमित शहांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले..
धक्कादायक : स्कूल बस चालकाचा शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार, असा झाला उलगडा
रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण क्षेत्रात अडकलेल्या ‘ त्या’ नऊ युवकांची सुखरूप सुटका
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा: शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात
सोयाबीन तेलाचे भाव सर्वाधिक घसरले
अदानी विल्मरच्या मते, सोयाबीन तेलात सर्वाधिक कपात झाली आहे. त्याची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. तर मोहरीच्या तेलात सर्वात कमी कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत 195 रुपयांवरून 190 रुपये प्रति लीटर झाली आहे.
धारा ब्रँडची किंमतही कमी करण्यात आली
प्रमुख दूध पुरवठादार मदर डेअरीनेही धारा ब्रँडच्या तेलांच्या किमती कमी केल्या होत्या. मदर डेअरी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकते. कंपनीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलमध्ये प्रति लिटर १४ रुपयांची कपात केली आहे.