पुणे : अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 35 वर्षीय बस चालकाला शालेय विद्यार्थीनीचा बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. 15 वर्षांच्या मुलीसी गोड बोलून या बस चालकानं मैत्री केली होती. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता. या मुलीसोबत त्याने संबंध ठेवल्याप्रकरणाचा खुलासाही धक्कादायक पद्धतीने झाला होता. 16 जुलै रोजी 15 वर्षांची विद्यार्थीनी आरोपी स्कूल बस चालकाला भेटून रात्री उशिरा घरी परतली होती. त्यावेळी या मुलीच्या आईला संशय आला. त्यानंतर या प्रकरणाचा हळूहळू उलगडा झाला. आईने मुलीची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. अखेर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आणि मग पुढील कारवाई केली गेली.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्कूल बस ड्रायव्हरला अटक केली होती. दरम्यान. मुलीच्या संमतीने संबंध ठेवल्याचा दावा आरोपी स्कूल बस चालकाने केला होता. पण बलात्कार प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या संमतीचा प्रश्नत येत नसल्यानं अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स्कूल बस चालकालाही बेड्या ठोकण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण क्षेत्रात अडकलेल्या ‘ त्या’ नऊ युवकांची सुखरूप सुटका
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा: शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात
मुक्ताईनगर नगरपंचायतीवर राज्यातील शिंदे समर्थक पहिला तरुण नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब
कलम 376 नुसार बलात्काराच्या गु्न्ह्याखाली या स्कूल बस चालकावर आता खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी रविवारीच या आरोपीला कोर्टासमोर हजर केलं होतं. कोर्टानं 25 जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
3 वेळा बलात्कार!
स्कूलबस चालकानं मार्च ते जुलै दरम्यान, तीन वेळा या मुलीवर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. या मुलीसोबत मैत्री करत स्कूल बस चालकानं तिच्याशी संबंध वाढवले. त्यानंतर तिचा बलात्कार केला, असा गंभीर आरोप केला गेलाय. रविवारी आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला लगेचच कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.