पुणे -इंदोर वरून अमळनेर जाणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याने या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इंदोर वरून पुण्याला जाणाऱ्या एसटी बस थेट नर्मदा नदीत कोसळली सदर अपघात मध्य प्रदेशातील धारमध्ये झाला आहे.
दरम्यान , 12 ते 15 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.याबाबत अधिक वृत्त कळू शकले नाही.