नवी दिल्ली – सर्व सामान्यांना झटका देणारी बातमी असून आज सोमवार पासून बिगर ब्रँडेड पण लेबल लावून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाले आहे. आधीच देशात महागाईने डोकं वर काढलं असतांना त्यात नव्याने भर पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल हे निश्चित.कणिक, पनीर, दही यांसारख्या सुट्या व बिगर ब्रँडेड वस्तू विकताना त्यावर पाच टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. त्याच वेळी ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रुग्णालय खोल्यांसाठी जीएसटी आकारण्यात येणार असल्याने वैद्यकीय सेवाही महागणार आहेत.
असे असतील नवे जीएसटी दर-
– छपाई, लेखन किंवा ड्रॉइंग इंक- १८%
– कटिंग ब्लेडसह चाकू, पेपर चाकू, पेन्सिल शार्पनर आणि ब्लेड, चमचे, काटे, स्किमर्स इ.- १८%
– विद्युत उर्जेवर चालणारे पंप प्रामुख्याने पाणी हाताळण्यासाठी डिझाइन केलेले जसे सेंट्रीफ्यूगल पंप, खोल नलिका-विहीर टर्बाइन पंप, सबमर्सिबल पंप, सायकल पंप – १८%
– तृणधान्ये साफ करणे, कडधान्यांचे वर्गीकरण किंवा प्रतवारी करणे, बियाणे वापरण्यासाठी यंत्रे, दळण उद्योग किंवा धान्य प्रक्रियेसाठी यंत्रसामग्री, पवनचक्क्या, हवेवर आधारित पिठाच्या गिरण्या, वेट ग्राइंडर – १८%
– अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे, मिल्किंग मशीन आणि डेअरी मशिनरी – १८%
– एलईडी दिवे, दिवे आणि फिक्स्चर, त्यांचे मेटल सर्किट बोर्ड – १८%
– ड्राइंग आणि त्याची साधने – १८%
– सोलर वॉटर हीटर्स आणि सिस्टम- १२%
– फिनिश लेदर / कॅमोइस लेदर / कंपोझिशन लेदर – १२%
– चेक, लूज चेक किंवा बुक फॉर्ममध्ये – १२%
– नकाशे आणि इतर हायड्रोग्राफिक किंवा तत्सम तक्ते, अॅटलसेस, भिंतीचे नकाशे, स्थलाकृतिक योजना आणि ग्लोब, छापलेले नकाशे -१२ %
– १००० रुपयांपर्यंतच्या हॉटेलमधील मुक्काम – १२%
– रूग्णालयातील खोलीचे भाडे (ICU वगळून) प्रति रुग्ण प्रतिदिन ₹५००० पेक्षा जास्त असल्यास त्यावर (ITC नसलेल्या खोल्यांसाठी) ५% दराने शुल्क आकारले जाईल.
– रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, स्मशान इत्यादीसाठी कामाचा करार -१८%
– केंद्र आणि राज्य सरकारे, ऐतिहासिक वास्तू, कालवे, धरणे, पाईपलाईन, पाणीपुरवठ्यासाठी प्लांट, शैक्षणिक संस्था, रुग्णालये इत्यादींसाठी स्थानिक प्राधिकरणे आणि त्यांच्या उप-कंत्राटदारांना पुरवले जाणारे कामाचे करार-१८%
– केंद्र आणि राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक प्राधिकरणांना पुरवले जाणारे कामाचे कंत्राट मुख्यत्वे मातीकाम आणि त्यांचे उप-करार – १२%
– महत्वाचे म्हणजे या सर्वांमध्ये, डब्बा किंवा पॅकेट बंद आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता ५% GST लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.
– सध्या १२ टक्के जीएसटी लागू असणाऱ्या शाई (प्रिटिंग, लेखन व चित्रकला यासाठी वापरली जाणारी), कटिंग ब्लेडसह मिळणारे चाकू, कागद कापण्याचे चाकू, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, चित्रकलेसाठी लागणारे साहित्य या सर्व वस्तूंवर आता १८ टक्के जीएसटी लागेल.
सोलर वॉटर हिटरवर सध्या पाच टक्के जीएसटी लागत होता. त्यावर आता १२ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
– रस्तेबांधणी, पूलबांधणी, रेल्वे, मेट्रो यासाठी दिले जाणारे कंत्राट, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, स्मशानातील विधी व साहित्य यांवर आता १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागणार.
The changes relating to GST rate, in pursuance of recommendations made by the @GST_Council in its 47th meeting, came into effect from today, 18th of July, 2022.
Here is the FAQ regarding the GST levy on ‘pre-packaged and labelled’ goods ????
Read more ➡️ https://t.co/5mHCh9PFyX pic.twitter.com/s3Yfj5QVev
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 18, 2022