मुंबई, (प्रतिनिधी) – पोटच्या मुलीला आधी रागात मारहाण केली व त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली असून एवढ्यावरचं हा ‘नराधम बाप’ थांबला नाही तर या नराधम बापाने मुलीच्या मृतदेहासोबत बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आल्याने जन्मदात्याच्या नात्याला काळिमा फासल्या गेलं आहे. त्या नराधम बापा विरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो तसेच हत्येचा गुन्हा दाखल आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार भिवंडी परिसरात राहत असलेल्या एका परिवारात मृत मुलगी नराधम बाप आणि आई असा परिवार राहत होते.दरम्यान पोटच्या मृत पीडित मुलीवर अनेक दिवसापासून नराधम बाप लैंगिक अत्याचार करत असल्याने मृत मुलगी त्याला विरोध करत असल्याने नेहमीच बाप – लेकीमध्ये भाडणं व्हायची, त्यातच नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून मुलीवर बळजबरी करत असल्याने दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात बापाने मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या मृत मुलीवर बलात्कार केला. या नराधम बापाने तिचा टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला होता.
हे पण वाचा….
अति भयंकर : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने चक्क विजेचा शॉक घेऊन केली आत्महत्या
दिशा पटानीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ! एकदा फोटो पहाच
सोने खरेदीची हीच योग्य वेळ.. जाणून घ्या आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव
विनापरीक्षा ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा चान्स, तब्बल 45,000 रुपये पगार मिळेल
भारतीय नौदलात तब्बल २८०० जागा रिक्त, 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा
घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर नराधम बापावर पोक्सोसह अत्याचार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. नराधम बापाला भिवंडी शहरातून तीन तासातच अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.