जळगाव : पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिठ्ठी लिहून दिल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता पुन्हा यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चिठ्ठीच्या मुद्द्यावरून आता विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
यापूर्वी या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातून माईक घेतला होता. आता पुन्हा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंना चिठ्ठी लिहून दिली. या गोष्टी नेमक्या एकमेकांना मदत करण्यासाठी घडत आहेत, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी, हे आता सांगता येणार नाही. शिंदे गट व भाजप युतीतील सरकार पूर्ण क्षमतेने चालेल, त्यावेळेस नेमकं सांगता येईल, की कोण कोणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.
हे पण वाचा..
अति भयंकर : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने चक्क विजेचा शॉक घेऊन केली आत्महत्या
दिशा पटानीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ! एकदा फोटो पहाच
सोने खरेदीची हीच योग्य वेळ.. जाणून घ्या आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव
उद्धव ठाकरेंना धक्का, औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती
दरम्यान, शिंदे गटात सहभागी झालेले आमदार नेमके हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, की त्याला इतर काही कारणे आहेत, हे नेमकं कळत नाही. मात्र जर हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांनी हिंदुत्वासाठीच लढावं, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला जाऊन मिळालेला आमदारांना उद्देशून लगावला आहे.