मुंबई: मागील गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जळगाव जिल्ह्यातही सोमवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात येत्या 12 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कारण अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यानं ढग मोठ्या प्रमाणावर निर्माण होतायेत. परिणामी राज्यात पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यवी असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. विशेष: कोकणामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
हे पण वाचा :
महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ
अभिनेत्री आमना शरीफचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ
मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत इतके मंत्रिपद
नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकांचा समावेश
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे अनेक धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील ज्या दहा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यात खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथकं देखील तैनात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये देखील पाऊस सुरूच होता. मात्र कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मुंबकरांना दिलासा मिळाला आहे.