नवी दिल्ली : देशात पेट्रोल बंदीची कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही, पण येत्या ५ वर्षात देशात पेट्रोलवर बंदी येईल, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या दाव्याची वस्तुस्थिती भविष्यातच कळेल, पण देशात पेट्रोलचा स्वस्त पर्याय लागू झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात गुरुवारी बोलताना गडकरी यांनी आगामी काळात देशात पेट्रोलवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला. यावेळी कृषी विद्यापीठाने गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवीही प्रदान केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आता विदर्भात बनवलेले बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते 70 रुपये किलो दराने विकता येते. ते म्हणाले की, येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल. केवळ गहू, तांदूळ, मका आदी पारंपरिक पिके घेऊन शेतकऱ्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. आता शेतकऱ्याला काही तरी आऊट ऑफ द बॉक्स करावे लागेल. गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता ऊर्जा दाता तसेच अन्नदाते बनण्याची गरज आहे.
हे पण वाचा :
महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ
अभिनेत्री आमना शरीफचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ
मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत इतके मंत्रिपद
नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकांचा समावेश
गडकरी म्हणाले की, इथेनॉलच्या निर्णयामुळे देशाचे 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील. केंद्रीय मंत्री म्हणाले की, विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना आहे, त्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.