मुंबई,(प्रतिनिधी)- आज शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवसाच्या समारोपाच्या भाषणावेळी ‘तीन’मोठ्या घोषणा करून जोरदार पणे कामाची सुरवात केली आहे.राज्यात महाविकास सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते, आज अखेर शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केल्याने शिंदे गोटात उत्साहाचे वातावरण होतं दरम्यान पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या तीन घोषणा केल्याने जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहेत त्या ‘तीन’ घोषणा…
१)शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार,
२)राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल
३)हिरकणी गाव वाचवण्याकरता २१ कोटींचा निधी मंजूर
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 4, 2022
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील सामान्य जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.