मुंबई, (प्रतिनिधी) – शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीबहुमताने निवड झाली यावेळी अभिनंदनपर भाषण करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी बाकावरील भाजप आणि शिंदे गटाला धू-धू धुतले. फडणवीसांना मुख्यमंत्री केले नाही म्हणून भाजप नेते ढसाढसा रडत आहेत असे सांगतानाच आमच्याकडून गेलेलेच सत्ताधाऱ्यांच्या पहिल्या रांगेत दिसत आहेत, असा जोरदार चिमटा अजित पवार यांनी काढला दरम्यान अजितदादा पवार यांच्या सभागृहातील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतं असून मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.
अजितदादांची गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली …
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील असे सांगितले तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता.गिरीश महाजन यांचे तर अजूनही रडणे बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर फेटा सोडून डोळ्यात आलेले पाणी पुसण्यासाठी ते फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचे फारच वाईट वाटले,” असे म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली.
कुठं बाकडं वाजवताय?, चंद्रकांत पाटील यांनाही चिमटे
यावेळी अजित पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही चिमटे काढले. ते म्हणाले, “कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक आहे. भाजपच्या १०६ आमदारांनी आपल्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून स्वत: ला विचारा की जे घडलंय त्यानं आपलं समाधान झालं आहे का? चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रीपद मिळणार आहेत? सगळ्यांना वाटतंय मिळेल. काय होईल काही सांगता येत नाही, असे म्हणताच सभागृहात हंशा उसळला.
शिंदेंनी नार्वेकरांना आपलेसे करावे अन्यथा… राहुल नार्वेकर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. त्यांच्या बरोबर त्यांनी काम केले. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अतिशय जवळ जातात. शिवसेनेत आदित्य ठाकरे यांना आपलेसे केले. आमच्याकडे आले आणि मला आपलेसे केले. भाजपमध्ये फडणवीसांना आपलेसे केले. आता शिंदेसाहेब, तुम्ही त्यांना आपलेसे करून घ्या. नाहीतर काही खरे नाही, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
मूळ भाजपचे बाजूला….
मान्यवरांविषयी वाईट वाटतं अजित पवार पुढे म्हणाले, “मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत. पहिली रांग पाहिली तरी ते लक्षात येईल. गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत हे आमच्याकडून गेलेले मान्यवर पहिल्या ओळीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे बसलेले दीपक केसरकर तर काय चांगले प्रवक्ते झाले आहेत. म्हणजे त्या वेळी आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही,” असे अजित पवारांनी म्हटले.
दादा ???????????? pic.twitter.com/gGNipVCYE5
— ???????????????????????? ????????????????????????. (@yuvraj_speaks__) July 3, 2022