शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्या नंतर राज्यभरात त्यांना घेऊन राजकीय वर्तुळात, सोशल मीडियामध्ये टिंगल उडवली जात होती. राज्यातील भाजपा पक्षातील नंबर एक च्या नेत्यानं सर्वाधिक आमदार संख्या असतांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं म्हणून खिल्ली उडवली जात होती तर उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, “मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचं पालन करतो,” असं त्यांनी ट्विटवर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.उपमुख्यमंत्रीपद हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांसाठी मोठा धक्का होता.असं असलं तरि आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 4, 2022
आज अखेर ट्विटरद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी ‘या’ टिंगलटवाळी करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे ते म्हणताय की,ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे.
फडणवीस शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्यास उत्सूक नव्हते त्यापेक्षा पक्षाच्या बाहेर राहून सरकारवर पकड त्यांना ठेवायची होती. पण, तरी देखील पक्ष नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे आदेश दिल्याने फडणवीस यांनी पक्षादेश मानला आहे.
राजकीय जाणकार सांगतात, “देवेंद्र पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेत. महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. याउलट एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव नाही. ठाण्याबाहेर त्यांना फारसं कोणी ओळखत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची नाराजी असणं साहजिक होतं परंतु पक्षाने दिलेला आदेश देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम असल्याचे मानत शपथ घेतल्याने ‘मोठ्या मनाचा माणूस’ म्हणून त्यांच्यावर राज्यभरातून कौतुक देखील होतं आहे.