मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे विधानभवन कार्यालय सील करण्यात आले असून त्यावर नोटीस चिकटवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यताय
उद्धव ठाकरे हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या धक्क्यानं पायउतार झाल्यानंतर विधानसभेचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. यादरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुक देखील होणार आहे. यामुळे शिवसेनेकडून दोन व्हीप काढण्यात आले आहेत. एक व्हीप सुनील प्रभू यांनी काढलाय. या व्हीपमध्ये राजन साळवी (Rajan Salvi) यांना मतदान करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. तर दुसरीकडे भरत गोगावले यांनीही व्हीप जारी केलाय. या व्हीपमधून भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.
हे पण वाचा :
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो
या कारणावरून मुख्यमंत्री शिंदेंवर अनेकांनी व्यक्त केला संताप ; नेमका काय आहे प्रकार? पहा Video
या व्हीपच्या संघर्षात विधीमंडळातील शिवसेना कार्यालय सील करण्यात आल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही बंडात आतापर्यंत शिवसेनेचं विधान भनवाची कार्यालय सील करण्यात आलेलं नव्हतं. पहिल्याच शिवसेनेनं ऐतिहासिक बंड पाहिलं आहे. दोन तृतीआंश पेक्षा जास्त आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल. आता मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच विधीमंडळ कार्यालयच सील केल्यानं चर्चांना उधाण आलंय.