मुंबई : शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले. यानंतर ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बंडखोर आमदार आणि भाजपच्या आमदारांमध्ये बैठक पार पडली. दरम्यान बैठकीनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकबाबत प्रतिक्रिया दिली.
विधानसभेत आमचे 170 पेक्षा जास्त आमदार असतील आणि मोठ्या बहुमताने आमचा अध्यक्ष निवडून येईल”, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. यावेळी महाजनांना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविषयी वितचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सगळे ओकेमध्ये आहेत. शहाजी बापूंना आम्ही कडकडून मिठी मारली, अशी प्रतिक्रिया दिली.
आम्ही सर्व कायदेशीरपणे तपासून घेतले आहे. शिवसेनेकडे मोजून 15 आमजार राहिलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 41 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त संख्या आहे. व्हीप लागू होईल किंवा ना होईल हा दूरचा विषय आहे. पण सर्व कायदेशीर गोष्टींची आम्ही योग्य तपासणी केली आहे”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.