मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्रातील राजकारण हादरून गेलं आहे. शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांनी बंड पुकारला असून यामुळे महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी कोसळू शकते. दरम्यान शिंदे यांच्या बंडखोरी मागे नक्की कुणाचा हात आहे?असा सवाल सर्वानाच पडला आहे. काहीजण भाजपचे जाहीर पणे नाव घेत आहेत तर कुणी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे. शिंदे यांच्या पाठीमागे कुणी तरी मोठी शक्ती आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे बंड करण्यापर्यंत धाडस करणार नाही,” असे खडसे यांनी म्हंटले आहे.
एकनाथ खडसे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात काही आमदार थेट पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्यामुळे सध्या राज्यात जे राजकारण चालले आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. असे असले तरी मात्र शिंदे यांच्या बंडखोरी मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळे घडत आहे.
शिंदे व आमदारांना कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईलच. गेल्या ४० वर्षात असे राजकारण मी अनुभवले नव्हते राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे.”
हे देखील वाचा :
राज्यपालांचा ठाकरे सरकारला झटका : तातडीने पत्र लिहून दिल्या ‘या’ सूचना
भाजप-शिंदे गटात सरकार स्थापनेच्या चर्चा ; खाते वाटपही ठरले?
प्रेमासाठी काय पण! मैत्रिणीसोबतच्या लैंगिक संबंधाला विरोध, नंतर तरुणीने उचललं ‘हे’ पाऊल
नोकरीची सुवर्णसंधी….भाभा अणुसंशोधन केंद्रात 10वी पाससाठी अनेक पदे रिक्त
खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर 50 रुपयांनी घसरले, पण..
विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले आहे. या आमदारांमध्ये कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. “मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले, एक रुपया ठेवला नाही. पहिलं खातं गोठवलं, आता पैसे काढून टाकले. त्यानंतर राहते घरं १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली. नाथा भाऊने असा काय गुन्हा केला. न्यायालयात जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय. मी अशा प्रकारचे खालच्या स्तराचे राजकारण अनुभवले व्हवते, अशी टीकाही खडसेंनी भाजपवर केली.