मुंबई । एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने विविध निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. अनेक फाईल्स आणि जीआर हे मंत्रालयात घाईघाईत मंजूर करण्यात आल्याच्या आरोपानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहले आहे. तसेच दि. 22, 23 आणि 24 जूनला सरकारने मंजूर केलेल्या फाईल्स आणि प्रस्तावांचा तपशील देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
राज्यात विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी घाईगडबडीत कोट्यावधी कामांचे जीआर मी काढत कामांना मंजुरी देण्यात आली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून आक्षेप घेत त्यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहून याबाबत तपशील मागवला आहे.
हे देखील वाचा :
नोकरीची सुवर्णसंधी….भाभा अणुसंशोधन केंद्रात 10वी पाससाठी अनेक पदे रिक्त
खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर 50 रुपयांनी घसरले, पण..
गुलाबराव पाटलांसह या मंत्र्यांची खाती काढली ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
राज्यपालांनी प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यपालांना पाठवले जाणारे निर्णय, विचार विमर्श, जीआर आणि परिपत्रकांचा तपशील सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. काल सोमवारी पत्र मिळाल्यावर मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव (संस्था आणि व्यवस्थापन) यांना डेटा एकत्र करण्यास सांगितले आहे.