जळगाव। सध्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच जळगावात घरातील किरकोळ कारणावरून २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास केली. आशा विशाल इंगळे (वय-२२) रा. जिजाऊ नगर, वाघ नगर असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आशा विशाल इंगळे ह्या पती विशाल, सासू सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्याला असून शनिवार ७ मे रोजी सकाळी ९ वाजता घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या संतापाच्या भरात आशा इंगळे यांनी घराच्या वरच्या मजल्यावर जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
हा प्रकार त्याची दिरानी मनिषा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून आशाबाई यांना खाली उतरवून खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, शनिवारी ७ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहे.