मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.तर, राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील हिंदू अयोध्येत दाखल होतील. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील हिंदूंनीही आम्हा अयोध्या भेटीचं निमंत्रण दिलं आहे. अस्सल हिंदुत्वाचं त्यांना स्वागत करायचं आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
तसेच आमचा दौरा राजकीय नाही. आम्ही एका श्रद्धेतून अयोध्येला जाणार आहोत. भक्तीभावाने अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो. राजकीय हेतून गेल्यावर राम कधीच आशीर्वाद देत नाही, असा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.