- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा शहर मतदार संघातील मतदारांशी संवाद

जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाच्या नावावर व भावनिक कारणांवर राजकारण केले जात आहे. त्यामुळे विकास हरवल्याची स्थिती आज निर्माण झाली आहे. जळगाव शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यात देखील हे सरकार अपयशी ठरले आहे.तरी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला आपली जागा दाखवा असे विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने नागरिक बांधवांसोबत संवाद साधतांना राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी म्हटले.
शहरातील सुप्रीम काॅलनी परिसरांत नागरिकांसोबत संवाद साधताना नागरिकांनी विविध समस्यावर चर्चा केली. आजपर्यंत सत्ताधार्यांना समस्या सोडवता आल्या नाही भविष्यात आपण मला संधी दिल्यावर निश्चीतपणे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणार तसेच जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे. शहराच्या विकासाठी मी वचनबद्ध असल्याचे अभिषेक पाटील यांनी यावेळी सांगितले.














