मुंबई : पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी साबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले.पोलिसांनी कोणता प्रश्न विचारला याबाबत स्वतः फडणवीसांनी विधानसभा सभागृहात माहिती दिली. मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीत विचारलेले प्रश्न हे आरोपीसारखे होते, असे फडणवीस म्हणाले.
तसेच फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना, आणखी एक खळबळजनक दावा केला. जाणीवपूर्वक कुणीतरी आधीची प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येते का? आरोपी-सहआरोपी करता येतं का? अशा प्रकारचे प्रश्न होते. मला काहीही फरक पडत नाही. मी एक वकील आहे आणि मला समजतं. मी तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक म्हणून सुरक्षित आहे. मी अतिशय जबाबदारीने वागलो आहे. मला तर असं वाटतं की, कालचे प्रश्न पाहिल्यानंतर याला काहीतरी राजकीय वळण आहे. मला काहीही अडचणी नाहीत, असे फडणवीस म्हणाले. मी ज्या घरातून येतो ते सगळ्यांना माहिती आहे.
हे पण वाचा :
नोकरीची उत्तम संधी.. RCFL राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.मध्ये मोठी पदभरती
.. अन् ९ महिन्याच्या चिमुकलीसह आईने घेतला गळफास ! धुळ्यातील घटना
वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
रावेर आगारातील एस.टी.चालकाची आत्महत्या
सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती
प्रश्न कुणी आणि कुठे बदलले हे सगळे मला माहीत आहे. त्याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वडिलांना इंदिराजींनी दोन वर्षे जेलमध्ये ठेवण्यात आले होते. कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूलाही १८ महिने तुरुंगात ठेवलं होतं. तुरुंगात जायला घाबरणारे लोक नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. आम्ही जनतेसाठी लढणारे आहोत. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. त्याच्यावर आम्ही लढत राहणार आहोत आणि म्हणून तुम्हाला काय करायचं असेल ते करा, आम्ही कायदेशीर लढाई लढू, असेही ते म्हणाले.