पारोळा : शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तमाशा मंडळात काम करणाऱ्या तरुण-तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. दरम्यान, त्यांच्या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली.
याबाबत असे की, भिका-नामा तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी येथून येथे दि. २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ वाहन नादुरुस्त झाल्याने थांबले होते. तमाशा मंडळातील तरुणी अंजली अशोक नामदास व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे हे दोन्ही तमाशा मंडळातच काम करतात.
हे देखील वाचा :
पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी ; इतका मिळणार पगार
धक्कादायक ! गुंगीचे औषध देवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सोन्याचे दर विक्रमी पातळीवर, वाचा जळगावच्या सुवर्ण नगरीमधील दर
जळगावात नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या
दरम्यान, या दोघांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले. दरम्यान, दोघांना सहकाऱ्यांनी लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर २५ रोजी पुढील उपचारार्थ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा अंजलीची प्राणज्योत दुपारी दोनला मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहाला मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.