भुसावळ प्रतिनिधी | शहरातील शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी तथा नाहाटा महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कोमल भगवान तायडे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली.
काय आहे प्रकार?
हुडकाे काॅलनीतील रहिवासी कोमल तायडे हिने तिची आई खालील घरात असताना वरील मजल्यावरील खोलीत दाेरीने गळफास घेतला. दरम्यान, आईने वारंवार आवाज दिल्यावरही कोमलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आईने घराचा वरील मजला गाठला. तेथे कोमलने गळफास घेतल्याचे दृष्य पाहून त्यांनी हंबरडा फाेडला.
ही माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील यांनी तातडीने हुडको कॉलनीतील घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कोमलने गळफास घेण्यासाठी वापरलेली दोरी जप्त केली. यानंतर मृतदेह नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. या घटनेप्रकरणी सतीश सपकाळे यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद पुढील तपास करत अाहे. दरम्यान, कोमलने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांप्रमाणे शेजाऱ्यांना देखील धक्का बसला.
हे देखील वाचा :
आयकर विभागाने दिला इशारा! जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान
पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी वाढणार? जाणून घ्या तज्ञांचे मत
बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल, ‘हे’ दोन पेपर लांबणीवर
सोन्याचे दर विक्रमी पातळीवर, वाचा जळगावच्या सुवर्ण नगरीमधील दर
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या
काेमल ही शहरातील नाहाटा कॉलेजमध्ये अकरावीच्या विज्ञान शाखेचे शिक्षण घेत हाेती. तिचे वडील भगवान तायडे हे देखील नाहाटा कॉलेजमध्येच नोकरीला अाहे. कोमलने आत्महत्या का केली? याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. तपासात या बाबी समोर येतील. मात्र, घटनास्थळी चिठ्ठी आढळली नाही, अशी प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.