विमानाचा शोध कुणी लावला असा प्रश्न कोणी विचारला तर तोंडात पाहिलं नाव येतं ते राईट बंधुचं मात्र विमानाचा शोध कोणी लावला याविषयी थोडा संभ्रम आहे. असं म्हटले जातं कि, शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा पहिल्यांदा शोध लावला. पण, तळपदे यांच्याऐवजी राईट बंधूनी विमानाचा शोध लावल्याचे म्हटले जाते.अभ्यासात देखील असंच शिकवले जाते.
शिवकर बापूजी तळपदे हे भारतीय
शिवकर तळपदे हे मुळ भारतीय असून ते मुंबईत वास्तव्याला होते तळपते यांनी खूप मेहनत करून एका विमानाची निर्मिती केली होती. विमान बांधणी पूर्ण झाल्यानंतर तळपदे यांनी सन 1895 मध्ये त्याची यशस्वी चाचणी मुंबईकरांसमवेत गोविंद रानडे आणि सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत मुंबई चौपाटीवर करण्यात आली होती. विमानाने 20 मीटर उंचीपर्यंत उड्डाण केलं आणि खाली आले. त्यानंतर तळपदे त्यावर खूप प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले. परंतु, काही वर्षांनी त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी बनवलेलं विमान त्यांच्या मुलांसाठी खेळणं बनून राहीले.
शिवकर तळपते यांच्या निधनानंतर तब्बल 8 वर्षांनी म्हणजेच सन 17 डिसेंबर 1903 मध्ये राईट बंधूनी बनवलेल्या विमानाने यशस्वी उड्डाण केले. आणि त्याच धर्तीवर नंतर कितीतरी विमानांची निर्मिती झाली. म्हणून आज आपणांला कोणीही, “विमानाचा शोध कोणी लावला?” असं विचारल्यास, आपण राईट बंधूंच नाव घेतो.