मुलीने शिक्षिकेला दिली अत्याचाराची माहिती…
पीडित सोळा वर्षाच्या मुलीने बाप आणि भाऊच लैगिंक अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकेला आणि मुख्यध्यापकांना दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
दोन वर्षांपासून नराधम करत होते अत्याचार
गेल्या दोन वर्षांपासून मुलीचा बाप आणि भाऊ मुलीवर अत्याचार करत असल्याचं ऐकून शिक्षकांनाही धक्काचं बसला. पीडित मुलीने तिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारांची संपूर्ण पाढाचं पोलिसांसमोर वाचला. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्यांतर्गत वडील आणि भावाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.४३ वर्षीय वडिलांनी आणि २० वर्षीय भावाने विनयभंग करत अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. दोघेही पीडितेवर २०१९ पासून अत्याचार करत होते असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल होताच वडील आणि भावाला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
हे सुद्धा वाचा….
कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी, वाचा एकदा
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा
१ फेब्रुवारीपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित हे नियम बदलणार, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल
नंदुरबार स्थानकाजवळ ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार, गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग