मुंबई : भाजप आमदार निलेश राणेंना मोठा झटका बसला आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे लवकरच राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आता सुप्रीम कोर्टाने देखील राणेंना दणका देत अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. दरम्यान, कायदा सर्वाना समान असतो , केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असला तरी कायदा तोच अस हे आज सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली.
नेमकं काय आहे प्रकरण-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ला झाला. प्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. त्यांनतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.