जामनेर : आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरटय़ांनी १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविल्याची घटना पाचोरा शहरात घडलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चोरी करतांनाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावर असलेल्या आयडीबीआय बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे लंपास केले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला.
हे सुद्धा वाचा :
धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात ओढत नेत केला अत्याचार
Jio चा धासू प्लॅन! कमी किमतीमध्ये मिळेल दररोज 1GB डेटासह बरंच काही
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (वय ३६, रा. जामनेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.