जळगाव । जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना बुधवारी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी केली. डॉ.मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे क्वारंटाईन झाले आहेत.