मुंबई : भारतातील प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार ऑफर्ससह येणारे प्लान्स आणत असतात. कंपन्यांकडे वेगवेगळ्या प्राइस रेंज आणि वेगवेगळ्या वैधतेसह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसह ओटीटी बेनिफिट्स देखील मिळतात. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जिओचे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स
जिओचा ६६६ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
जिओचा १,०६६ रुपयांचा प्लान: जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय, १ वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
जिओचा १,१९९ रुपयांचा प्लान: जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
Airtel चे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स
एअरटेलचा ४५५ रुपयांचा प्लान: एअरटेलच्या या प्लानची किंमत ४५५ रुपये असून, यामध्ये ८४ दिवसांसाठी एकूण ६ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एकूण ९०० मोफत एसएमएस मिळतात. याशिवाय, प्लानमध्ये एक महिन्यासाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन, शॉ अकॅडेमीचा मोफत ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, तीन महिन्यांसाठी अपोलो २४/७ क्लिनिक सबस्क्रिप्शन, हॅलो ट्यून्स आणि विंक म्यूझिकचा मोफत अॅक्सेस दिला जात आहे.
एअरटेलचा ७१९ आणि ८३९ रुपयांचा प्लान
एअरटेलचा ७१९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.
एअरटेलचा ८३९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये कंपनी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देत आहे.
वरील दोन्ही प्लान्समध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे एक महिन्यासाठी मोबाइल एडिशन, शॉ अकॅडेमीचा ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, तीन महिन्यांसाठी अपोलो २४/७ क्लिनिक सबस्क्रिप्शन, हॅलो ट्यून्स आणि विंक म्यूझिकचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
हे सुद्धा वाचा :
मोठी बातमी : या तारखेपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज
रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस
झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?
Vi चे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान
वीआयचा ४५९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये यूजरला एकूण ६ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि १००० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये वीआय मूव्हीज अँड टीव्हीचे सबस्क्रिप्शन मिळते.
वीआयचा ७१९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, प्लानमध्ये बिंज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट्स देखील मिळत आहेत.
वीआयचा ८३९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये कंपनी ८४ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देत आहे. तसेच, प्लानमध्ये बिंज ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट्स देखील मिळेल.