मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले कॉलेज कधी सुरु होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना नेहमी पडायचा. मात्र कोरोनाची संख्या कमी होत असल्याने राज्यात १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, असे शासन परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.
करोनामुळे मार्च, २०२०मध्ये बंद झालेली कॉलेजे १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी ऑफलाइन सुरू झाली. त्यावेळी करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी होती. परंतु, पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रुग्णसंख्या घटू लागल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, असे शासन परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.
हे सुद्धा वाचा :
फेब्रुवारीत ‘इतके’ दिवस बँका बंद राहतील, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पहा
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज
रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस
झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?
दरम्यान, कॉलेजे सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून विद्यापीठांनी नियोजन करायचे आहे. तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, कॉलेजांनी हेल्पलाइनची व्यवस्था करावी आणि विद्यापीठांनी आपल्या वेबसाइटवर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाइन नंबर इत्यादी माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.