नवी दिल्ली: कालच्या तुलनेत आज देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आलीय. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आज सोमवारी 3 लाख 6 हजार 064 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत आज 27 हजार 469 रुग्ण घटले आहेत. दिवसभरात 439 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर, दिवसभरात 2 लाख 43 हजार 495 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील पॉझिटिव्हीटी रेट 20.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सध्या 22 लाख 49 हजार 335 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात 50210 रुग्ण आढळले आहेत. तर, महाराष्ट्रात 40 हजार 805 रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णांची स्थिती
रविवारी राज्यात 40 हजार 805 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 27 हजार 377 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 70 लाख 67 हजार 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर,राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2579 वर पोहोचली आहे. तर, 1225 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.रविवारी एकाही ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.