सोलापूर : एसटी ड्रायव्हरच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या गॆल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे घडलीय. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
अमर माळी याचे दयानंद महाविद्यालयात १२वीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो गेल्या काही दिवसात शांत शांत बसत होता. अमरने बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली होती. वडिलांनी माझे काम दोन, तीन महिने झाले बंद आहे, मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे त्याला म्हणाले होते. बोलणे झाल्यानंतर वडील एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेले. अमर हादेखील घराबाहेर गेला, त्यानंतर तो दुपारी घरी आला.
घरात आई व त्याची चुलती जेवण करत होते. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला, मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता, आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला, शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला अमरला खाली उतरवले. अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला उपचारांसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.