जळगाव : सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण वाढले आहे. अशातच रावेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी तिच्याच अज्ञात व्यक्तीने मित्रासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील एका तरूणीच्या मित्राने तिचे लग्न मोडावे व बदनामी होईल या उद्देशाने तिच्या पतीच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून तरूणीसोबत असलेल्या एका मित्राचे एकत्र असलेले फोटो पाठविले.
हा प्रकार तरूणीच्या लक्षात आल्यानंतर बुधवारी तरूणीने सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार फोटो पाठविणा-या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.