मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला.या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा झटका दिला आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणेंना घालण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली, त्याच्या स्वागताच्या निमित्ताने नितेश राणे माध्यमांसमोर आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. त्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर, नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. आता कोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा झटका दिला आहे.
हे देखील वाचा :
संजय राऊत यांनी अखिलेशला दिला मोठा सल्ला, म्हणाले..
ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले, कार तलावात जाऊन ‘जैन कंपनी’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी
ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची अपेक्षा
काही दिवसांपूर्वीच कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजवल्याने राज्यातले राजकारण तापले होते, नितेश राणे यांचा पोलीस शोध घेत होते, त्यावेळी नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू असता नितेश राणे कुठे आहेत? असे विचारल्यावर, सांगायला मुर्ख आहे का? असे उत्तर दिल्याने बराच वाद पेटला होता.